Sonakshi Sinha
Sonakshi SinhaTeam Lokshahi

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हानं गुपचूप उरकला साखरपुडा

सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
Published by :
shweta walge

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha ) सध्या चित्रपटांमुळे नाही तर पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनाच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. तर आता सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये सोनाक्षीच्या बोटात अंगठी (Ring) पाहायला मिळत आहे. हे फोटो समोर आल्यानंतर सोनाक्षीने एंगेजमेंट (Engagement) केल्याचे समजते. फोटोंमध्ये सोनाक्षी खूप आनंदी दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाचे कोणासोबत एंगेजमेंट झाली आहे, तिने अद्याप याचा खुलासा केलेला नाही. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले 'हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. माझं स्वप्न पूर्ण होतं आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी उत्सुक आहे.'

फोटोंमध्ये सोनाक्षी त्याच व्यक्तीचा हात धरून हसताना दिसत आहे. सोनाक्षीने फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली , आणि ती व्यक्ती कोण आहे, असे विचारत आहेत.

सोनाक्षी ही ७०-८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची मुलगी आहे. सोनाक्षी अनेक दिवसांपासून झहीर इक्बालसोबतच्या (Zaheer Iqbal) नात्याबद्दल चर्चेत आहे. जरी दोघांनीही याबाबत कधीही कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. जहीरनं ‘नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. सोनाचा प्रिन्स चार्मिंग जहीर असल्याचा अंदाज तूर्तास बांधला जातोय. खरं काय ते लवकर कळेलच.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com