यंदा पहिल्यांदाच गणपती बसवत नाही; सोनाली कुलकर्णी भावूक

यंदा पहिल्यांदाच गणपती बसवत नाही; सोनाली कुलकर्णी भावूक

सोनाली कुलकर्णीनं भावनिक पोस्ट लिहित सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या
Published on

राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असून भक्तीभावाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा स्थापना करत आहेत. सेलिब्रिटींच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे. परंतु, यंदा पहिल्यांदाच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पा विराजमान झालेले नाहीत. परंतु नुकतेच सोनालीच्या आजीचं निधन झाल्यानं कुलकर्णी कुटुंबाकडून गणेशोत्सव साजरा होणार नाही. त्यामुळे सोनाली कुलकर्णीनं भावनिक पोस्ट लिहित सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनाली कुलकर्णी म्हणाली की, इतक्या वर्षात आम्ही यंदा पहिल्यांदाच गणपती बसवत नाही. आजी म्हणाली होती, मी गणपती येईस्तोवर थांबते, पण...निदान त्या शारिरीक वेदनांतून तिची सुटका झाली. ती जिथे कुठे असेल शांत, समाधानी, आनंदी असेल असं वाटतं. माझी लाडकी आजी आता माझ्या लाडक्या बाप्पाकडेच गेलीय. प्रिय आजी, पुढच्या वर्षी तू शिकवलंयस तसा, नेहमीप्रमाणे तुझ्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करू, अशी तिने इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे.

यासोबत सोनालीने मागच्या वर्षीचे गणेशोत्सवांचे फोटो शेअर केले आहेत. यात तिने मागील वर्षी स्वत:च्या हाताने बनविलेली बाप्पाची मूर्ती व आजीसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com