स्पेशल ऑफर! श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ’या नव्या सिनेमावर 1 तिकीटावर एक तिकीट फ्री

स्पेशल ऑफर! श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ’या नव्या सिनेमावर 1 तिकीटावर एक तिकीट फ्री

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले हे त्यांच्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले हे त्यांच्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 1 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रेयस तळपदेच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशामध्ये श्रेयस तळपदेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एकावर एक तिकीट फ्रीची ऑफर दिली आहे.

1 मार्चला म्हणजे उद्या हा चित्रपट रिलीज होणार असून फक्त उद्यासाठी ही ऑफर असणार आहे. प्रेक्षकांना बूक माय शोवर जाऊन या चित्रपटाच्या तिकीटाचे बुकींग करायचे आहे. यासाठी तुम्हाला HEAGBOGO हा कोड वापरायचा आहे. तरच तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे. या कोडच्या माध्यमातून तुम्ही एकावर एक तिकीट मिळवू शकता. 1 मार्चला म्हणजे उद्या हा चित्रपट रिलीज होणार असून फक्त उद्यासाठी ही ऑफर असणार आहे.

झी स्टुडिओ मराठीने देखील इन्स्टाग्रामवर या चित्रपटासंदर्भात पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ही अनोखी गाठ'ची प्रेक्षकांना १ वर १ फ्रीची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा.', या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत उद्या चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

दरम्यान, 'ही अनोखी गाठ' या चित्रपटाच्या माध्यमातून श्रेयस तळपदे आणि आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांचीच आहे. या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com