मनोरंजन
सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याची माहिती दिली आहे.
रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईमधील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होते. त्यावेळी त्यांच्यावर कॅरोटिड आर्टरी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर काल अखेर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.