मनोरंजन
Sushant Singh Rajput संबंधीत व्हिडीओ व्हायरल; ही अभिनेत्री म्हणाली, 'बदला घेण्यासाठी तो परत आला...'
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होते.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होते. सुशांतच्या निधनाला तीन वर्ष पूर्ण झाली. मात्र आजही त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याच्याबद्दल आठवणी ताज्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत हुबेहूब सुशांत सारख्या दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याचे नाव नाव डेनिम आयन असं आहे. विरल भयानी याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
या व्हिडिओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की, हा हुबेहूब सुशांत याच्यासारखा दिसत आहे. तसेच अभिनेत्री राखी सावंत हिने देखिल कमेंट केली आहे की, ‘बदला घेण्यासाठी तो परत आला…’
Admin