गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी 'बटरफ्लाय' या चित्रपटाची निवड

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी 'बटरफ्लाय' या चित्रपटाची निवड

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून मीरा वेलणकर दिग्दर्शित "बटरफ्लाय" या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून मीरा वेलणकर दिग्दर्शित "बटरफ्लाय" या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट येत्या बुधवारी म्हणजेच २२ नोव्हेंबरला दाखविण्यात येणार असून त्याआधी या चित्रपटाचा विशेष शो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ़ गोवा यांनी मंगळवार २१ नोव्हेंबरला रविंद्र भवन, मार्गो येथे संध्याकाळी ७ वाजता आयोजित केला आहे.

अशा पद्धतीने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आणि फिल्म बाजार या दोन्ही ठिकाणी दाखवला जाणारा हा एकमेव मराठी चित्रपट आहे. अशा अनोख्या आणि मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपटाचं स्क्रीनिंग होणं ही गौरवाची गोष्ट आहेयाप्रसंगी या चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते अभिजीत साटम चित्रपटाची निर्माती आणि प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम दिग्दर्शिका मीरा वेलणकर आणि ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रामध्ये प्रेक्षकांनी समीक्षकांनी कौतुक केलेला हा चित्रपट प्रत्येकानी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहायलाच हवा अशा ह्या "बटरफ्लाय" चित्रपटाचा आस्वाद आता गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया ला उपस्थित राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com