‘तुला पाहते रे’ मालिकेचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘तुला पाहते रे’ मालिकेचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published by :

मुंबई | 'तुला पाहते रे' ही छोट्या पडद्यावरील मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली होती. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'तेरे बिन जिया जाए ना,' असे या मालिकेच्या हिंदी रिमेकचे नाव आहे. ही मालिका 'झी टिव्ही' वाहिनीवर प्रक्षेपित केली जाणार आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेचा रिमेक आतापर्यंत सहा ते सात भाषेत करण्यात आला आहे.

'तेरे बिन जिया जाए ना,' या मालिकेचा प्रोमो सध्या युट्यूबवर ट्रेंडीगवर असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या ९ नोव्हेंबरपासून झी टीव्हीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे प्रोमो पाहता ही मालिका 'तुला पाहते रे' या मालिकेचा रिमेक असल्याचे बोललं जात आहे.वय विसरायला लावणाऱ्या विक्रांत-ईशाच्या प्रेमकहाणीने तरुणाईलाही वेड लावलं. गायत्रीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवली. यानंतर आता या मालिकेचा हिंदी रिमेक सुपरहिट ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com