'महाराष्ट्राची हास्य जत्रा' फेम शिवलीचा आयफोन दुचाकीस्वार चोरटयांनी हिसकावला

'महाराष्ट्राची हास्य जत्रा' फेम शिवलीचा आयफोन दुचाकीस्वार चोरटयांनी हिसकावला

पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

अभिजीत हिरे | भिवंडी : 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या मालिकेतील अभिनेत्री शिवाली परब हिचा फोन दुचाकीवरुन दोन चोरट्यांनी हिसकावून धूम स्टाईलने पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला.

अभिनेत्री शिवाली परब ही कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका इमारतीत राहते. शिवली रविवारी सकाळच्या सुमारास मिरारोड येथे चित्रीकरणासाठी निघाली होती. त्यावेळी तिने उबेरची ऑनलाईन ऑटोरिक्षा बुक केली. रिक्षातून प्रवास करत असताना तिची रिक्षा कल्याण भिवंडी मार्गावरील पिंपळास गावाच्या पुलाजवळ जवळ येताच, रिक्षाच्या मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी शिवालीच्या हातातील अ‍ॅपलचा मोबाईल बळजबरीने हिसकावून धूम स्टाईलने दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून शोध सुरु केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com