Chhaava Movie : 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ! मात्र चित्रपटात आला 'हा' ट्वीस्ट

Chhaava Movie : 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ! मात्र चित्रपटात आला 'हा' ट्वीस्ट

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात शिवाजी महाराजांचा आवाज ऐकू येतो. विकी कौशलने सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानले.
Published by :
Team Lokshahi
Published on

सध्या चर्चेत असलेला छावा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल पाहायला मिळत आहे. तसेच अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. तर दिव्या दत्ता राजमाता सोयराबाईंच्या भूमिकेत आहेत. त्याचसोबत रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे.

तसेच सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, नीलकांती पाटेकर, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर,मनोज कोल्हटकर हे मराठी कलाकार मराठा सरदारांच्या भूमिकेत झळकले आहेत.

लक्ष्मण उत्तेकर यांच्या छावा चित्रपटामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. छावा चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे, परंतु चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना कोणताही अभिनेता दिसत नाही.

या चित्रपटमध्ये शिवाजी महाराजांचा आवाज ऐकू येत आहे. हा आवाज चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचा आहे. चित्रपटात शंभूराजे जेव्हा अडचणीत आले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज येतात. सिनेसृष्टीमध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा बदलण्याचे सोडून अजून रंजक बनवण्यासाठी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांना यश आले आहे.

छावा चित्रपटांची कमाई जोरदार होत आहे. त्यासाठी विकी कौशल यांने सोशलमीडियावर पोस्ट केली आहे. "तुमच्या प्रेमाने मन भरुन आलं, खुप खुप धन्यवाद" असे म्हणत विकी कौशलने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्यामुळे आता चित्रपट प्रदर्शन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात कमाईचा आकडा 150 कोटी रुपयांच्या पुढे जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com