अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; पाहा संपूर्ण यादी

अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; पाहा संपूर्ण यादी

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला
Published by :
shweta walge

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2024 चा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच इतर क्षेत्रातील व्यक्तींना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पाहा संपूर्ण यादी.

पुरस्काराची संपूर्ण यादी

ए आर रहेमान यांना मास्टर दिनानाथ मंगशेकर पुरस्कार, प्रदीर्घ संगीत सेवेसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

पद्मविभूषण अमिताभ बच्च्न यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर 

 गालिब नाटक (उत्कृष्ट नाटककार 2023-24) ला मोहन वाघ पुरस्कार जाहीर 

 दीपस्तंभ फाउंडेशन मोनोबल (समाजसेवा) संस्थेला आनंदमयी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

 श्रीमती मंजिरी फडके प्रदीर्घ साहित्य सेवेकरता वाग्विलासीनी पुरस्कार जाहीर 

 रुपकुमार राठोड व्होकल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

भाउ तोरसेकर यांना राजकीय पुरस्कार जाहीर करण्यात आलं आहे.  

मास्टर दिनानाथ मंगेशकर थिएटर  अतुल परचुरे यांनाही पुरस्कार जाहीर 

दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने येत्या २४ एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. दीनानाथ नाट्यगृह येथे हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात अमिताभ बच्चन यांच्यासह संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com