राखी सावंतसह तीन सदस्यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दणक्यात एन्ट्री

राखी सावंतसह तीन सदस्यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दणक्यात एन्ट्री

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहे.

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहे. पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री ही स्नेहलता वसईकर हिने घेतली तर आता ‘बिग बॉस मराठी’मध्ये मोठा ट्विस्ट आला असून घरात चार सदस्यांनी चैलेंजर्स म्हणून एन्ट्री झाली आहे. घेतली आहे.

या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमध्ये राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जग्गनाथ हे आहेत. याचा व्हिडिओ ‘कलर्स मराठी’च्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये राखी सावंतची दमदार एन्ट्री दिसून येत आहे. ती म्हणत आहे की, राखीची एन्ट्री होताच तिने घरात “शेवंते…” असं म्हणताच अपूर्वाला हसू फुटलेले व्हिडीओत दिसत आहे. पुढे ती म्हणते, “मी या सर्वांची आई आहे. बिग बॉसची पहिली बायको…अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणार… आता हा ‘बिग बॉस’चा खेळ कसा खेळला जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com