काय सांगता! उर्फी जावेद 'या' मिस्ट्री वुमनला करतीयं डेट? फोटो केला शेअर

काय सांगता! उर्फी जावेद 'या' मिस्ट्री वुमनला करतीयं डेट? फोटो केला शेअर

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. तिचे फॅशन स्टेटमेंट खूपच बोल्ड असतात.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. तिचे फॅशन स्टेटमेंट खूपच बोल्ड असतात. उर्फी तिचे कपडे स्वतः डिझाइन करते आणि लूकवर बरेच प्रयोग करते. तथापि, उर्फी तिच्या डेटिंग लाईफबद्दल थोडी प्राईवेट वाटते. बॉलीवून इंडस्ट्रीमध्ये उर्फीचे नाव कोणाशीही जोडलेले दिसत नाही. मात्र, उर्फीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

उर्फी जावेद तिच्या डेटिंग लाईफ चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये उर्फी तिची महिलेला किस करताना दिसत आहे. ही महिला तिची मैत्रिण काजोल आहे. रिपोर्टनुसार, या फोटोनंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्या समोर येत आहेत. उर्फी आणि काजोल यांच्यात मैत्रीपेक्षा जास्त घट्ट नाते असल्याच्या बातम्या येत आहेत. उर्फी अनेकदा काजोलसोबत लंच आणि डिनरवर दिसली आहे. मात्र, उर्फी आणि काजोल यांच्यात मैत्रीपेक्षा वेगळे काही आहे की नाही यावर अधिकृतपणे उर्फी किंवा काजोल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याला त्यांनी दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, काजोल देखील एक अभिनेत्री आहे. ती पंचबीटसारख्या शोमध्ये दिसली आहे. तर, उर्फीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलत असताना, ती अलीकडेच बिग बॉस ओटीटी 2 मध्ये दिसली होती. येथे तिने पाहुणे म्हणून एन्ट्री घेतली होती. शोमध्ये पूजा भट्टने तिचे खूप कौतुक केले. नट आणि बोल्टचे कपडे घालून उर्फी येथे पोहोचली होती. उर्फीने ये रिश्ता क्या कहलाता है सारखे शो केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com