सुव्रत जोशी झाला ‘जॉबलेस’

सुव्रत जोशी झाला ‘जॉबलेस’

Published by :

जॉबलेस चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.कोरोनाच्या काळात अनेक वेबसिरीज प्रदर्शित झाल्या.लोकं घरी असल्यामुळे ओटीटीकडे लोकांचा कल चांगलाच वाढला.घरबसल्या लोकांचे भरघोस मनोरंजन होऊ लागले.त्यातील अनेक सिरीज लोकप्रिय ठरल्या.सध्या अनेक मराठी वेबसिरीज लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहेत.यापैकी 'जॉबलेस' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

ही वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे.जॉबलेस वेबसिरीजमध्ये सुव्रत जोशी,पुष्कर श्रोत्री प्रमुख भूमिकेत आहे.याचे दिग्दर्शन निरंजन पत्की यांनी केल आहे.

कोरोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या.हा ज्वलंत विषय 'जॉबलेस' या वेबसिरीजमधून मांडण्यात आला आहे.यातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी बोध मिळेल.ही वेबसिरीज प्रेक्षकांना ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com