Urmila Matondkar On Manish Malhotra
Urmila Matondkar On Manish Malhotra

Satya Movie मध्ये उर्मिला मातोंडकरने नेसली होती ५०० रूपयांची साडी, मनिष मल्होत्राने फोनकरून...

राम गोपाल वर्माच्या 'सत्या' चित्रपटाच्या री-रिलीज स्क्रिनिंग दरम्यान अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मोठा खुलासा केला आहे. या खुलाशावरून मनीष मल्होत्राने तिला फोनकरून जाब विचारला आहे.
Published by :
Published on

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचा कल्ट गँगस्टर चित्रपट 'सत्या' सिनेमा १७ जानेवारी रोजी री-रिलीज करण्यात आला आहे. रि- रिलीज आधी या चित्रपटाचं स्क्रीनिंग करण्यात आलं. यावेळी अभिनेता मनोज बाजपेयी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेता मकरंद देशपांडे आणि जेडी चक्रवर्ती तसेच चित्रपटातील अन्य कलाकार उपस्थित होते. यावेळी कलाकारांनी 'सत्या' चित्रपटाशी संबंधी असलेल्या काही खास आठवणी सांगितल्या. उर्मिला मातोंडकर यांचा चित्रपटातील लुक आणि तिच्या साड्याविषयीही चर्चा झाली.

उर्मिला मातोंडकर यांनी सांगितल्या आठवणी


उर्मिला मातोंडकरने एक आठवण सांगितली. आपल्याला एकदा मनीष मल्होत्रा यांनी चांगलचं सुनावलं असल्याची आठवण मातोंडकरने सांगितली. रंगिला सिनेमाच्या वेळी एका मुलाखतीमध्ये उर्मिला यांना सत्या सिनेमामध्ये घातलेल्या साडीविषयी विचारण्यात आलं. तेव्हा उर्मिला म्हणाल्या की, तुम्ही माझ्या सत्या सिनेमातल्या लुक्स बाबतीत इतके का प्रभावित आहात. मी तर सिनेमातील एका प्रसंगात ५०० रुपयांची साडी नेसली होती. ही गोष्ट उर्मिला मातोंडकर यांनी सहजच सांगितल्याचं त्या म्हणाल्या.

मनीष मल्होत्रा यांनी चांगलचं सुनावलं

उर्मिला यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना चार शब्द ऐकावे लागले. उर्मिला म्हणाल्या, 'यानंतर मला मनीष मल्होत्राचा फोन आला. आणि तू ५०० रूपयांची साडी नेसल्याचं का सांगितलंसच ते सांगणं गरजेचं होतं का असा सवाल मनीष मल्होत्रा यांनी विचारला. मात्र, त्यानंतर सगळं सुरळित झाल्याचं उर्मिला यांनी म्हटलं आहे.

१७ जानेवारी रोजी सत्या सिनेमा पुन्हा रिलीज

गँगस्टर फिल्म ‘सत्या’ १७ जानेवरी, २०२५ रोजी सिनेमागृहात पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला आहे. साल १९९८ मध्ये पहिल्यांदा हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला होता. उत्कृष्ट वास्तववादी कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट यादगार झाला आहे.  

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com