Vicky Kaushal and Katrina Kaif Baby Boy : मुलगा झाला हो...! विकी कौशल आणि कतरिना कैफ झाले आई-बाबा...
बॉलिवूडमधील स्टार कपल कतरीना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरी आनंदाचे क्षण आले आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ या दोघांच्य़ा घरी चिमुकली पाऊल धावणार आहे. कतरीना कैफने वयाच्या 42 व्या वर्षी मुलाला जन्म दिला असून ती आई झाली आहे, तर विकी कौशल बाबा झाला आहे. विकी आणि कतरिना यांनी त्यांच्या मुलाचे जगात स्वागत करताना एक संयुक्त पोस्ट शेअर केली. “आमच्या आनंदाचे कारण घरी आलं आहे. खूप आनंद आणि उत्साहाने आम्ही आमच्या मुलाचे स्वागत करतो.” असं त्यांनी लिहीलं.
विकीने आज म्हणजेच 7 नोव्हेंबर 2025 रोजी त्याच्या इन्टाग्राम अकाउंटला मुलगा झाल्याची गुड न्यूज शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर सिनेअभिनेते आणि अभिनेत्रींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच यावेळी कतरिनाचा दीर आणि विकीचा भाऊ सनी कौशलने विकी कौशलची पोस्ट स्टोरीला ठेवत घरी आलेल्या नव्या पाहूण्याचं स्वागत केलं आहे. विक्की कौशल बाबा झाल्यामुळे तो खूपच खूश आहे.
कतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चांना उधाण आलं होत. यादरम्यान विकी आणि कतरिनाच्या पोस्टनंतर अखेर पूर्णविराम मिळाला. तिने स्वतः सोशल मीडियावर ही आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली. कतरीना कैफ आणि विकी कौशल आई-बाबा झाले आहेत. दरम्यान, चाहते विक्की आणि कतरिनाच्या बाळाच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत होते. प्रत्येकजण बाळावर प्रेमाचा वर्षाव करतोय.

