Video|‘क्राइम मास्टर गोगो’आला परत
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. श्रद्धाचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धा चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच श्रद्धाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ फक्त श्रद्धा दिसत नाही आहे तर अभिनेते शक्ती कपूर सुद्धा दिसत आहेत.
अभिनेते शक्ती कपूर हे त्यांच्या गाजलेल्या भूमिकां पैकी एक म्हणजे 'क्राईम मास्टर गोगो'च्या भूमिकेत दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला श्रद्धा नेल पॉलिश लावताना दिसते. त्यानंतर अचानक हळूच शक्ती कपूर येतात. त्यांना पाहून श्रद्धाला धक्का बसतो आणि ती बापू बोलते. शक्ती कपूर बोलतात, 'क्राइम मास्टर गोगो' परत आला आहे आणि आलो आहे तर कसली तरी चोरी करेन. यानंतर शक्ती कपूर श्रद्धाची नेल पॉलिश चोरी करतात. तर श्रद्धा बोलते, 'हॉटस्टारला 'क्राइम मास्टर गोगो'ला परत आणायची काय गरज आणि आता ते कुठून काही पण चोरी करतील.'
या व्हिडीओला "अरे बापू नेलपॉलिश तर सोडली असती. 'गोगो' परत आले आहेत. आले आहेत तर कसली तरी चोरी करतीलच…" अशा आशयाचे कॅप्शन श्रद्धाने दिले आहे.