मनोरंजन
प्रसिद्ध अभिनेत्याच्या 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; राहत्या घरातच संपवलं जीवन
साऊथचे प्रसिद्ध अभिनेता आणि संगीतकार विजय अँटोनी यांची 16 वर्षीय मुलगी लारा अँटोनी हिने आत्महत्या केली आहे.
साऊथचे प्रसिद्ध अभिनेता आणि संगीतकार विजय अँटोनी यांची 16 वर्षीय मुलगी लारा अँटोनी हिने आत्महत्या केली आहे. विजय एंटलीची लाडकी लेक मीराने मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास चेन्नईतील अलवरपेट येथील राहत्या घरी गळफास घेतला आहे. त्यानंतर लाराला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.
विजय पहाटे 3 वाजता आपल्या मुलीच्या खोलीत गेला तेव्हा तिला ती फासावर लटकलेली दिसली. यानंतर विजय कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुलीला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. विजयची मुलगी बारावीत शिकत होती. मंगळवारी सकाळपासूनच या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
विजयच्या पत्नीचे नाव फातिमा असून तिचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे. विजय आणि फातिमा यांना मीरा आणि लारा या दोन मुली आहेत. आता मीराने आत्महत्या केली आहे.