Vijay-Rashmika Wedding : 'National Crush' आता अडकणार लग्नबंधनात, लग्र पत्रिका होत आहे व्हायरल
दक्षिणेतील लोकप्रिय कलाकार Vijay Deverakonda विजय देवरकोंडा आणि Rashmika Mandanna रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा रंगात आली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या आमंत्रणाची एक पत्रिका फिरत असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील राजेशाही वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या Udaipur उदयपूर येथे हा खास सोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. समारंभ खाजगी स्वरूपाचा असेल आणि फक्त कुटुंबीय व जवळचे मित्र उपस्थित राहतील.
यानंतर 3 मार्चला हैदराबादमध्ये मोठा रिसेप्शन आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर या सोहळ्याला हजेरी लावतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते.
दोघांची ओळख २०१८ मधील Geetha Govindam गीता गोविंदम या चित्रपटातून झाली. त्यानंतर Dear Comrade डियर कॉम्रेडमध्येही त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पडद्यावरील मैत्री हळूहळू खास नात्यात बदलल्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहेत. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी चाहत्यांनी मात्र सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. आता सर्वांचे लक्ष 26फेब्रुवारीकडे लागले आहे.
थोडक्यात
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील चर्चेत असलेले जोडपे Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna खऱ्या आयुष्यातही एकत्र येण्यासाठी सज्ज आहेत.
वर्षानुवर्षे चालणाऱ्या अफवांना मागे टाकत, हे पॉवर कपल २६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहे.
लग्नस्थळाची अधिकृत घोषणा नसली तरी, राजस्थानमधील उदयपूर येथे भव्य डेस्टिनेशन वेडिंगची तयारी जोरात सुरू आहे.
कुटुंब आणि जवळच्या मित्रांसह हे लग्न खाजगी असेल; त्यानंतर एक भव्य सेलिब्रेशन आयोजित केले जाणार आहे.

