Vikrant Massey: अभिनेता विक्रांत मेस्सीने घेतला अभिनयातून ब्रेक, "या" पोस्टमुळे चाहते हैराण
विक्रांत मेस्सीने 2013मध्ये लुटेरा या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. याआधी त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. '12th फेल' या चित्रपटामुळे त्याला मोठा चाहतावर्ग मिळाला. '12th फेल' मधील अभिनयासाठी तर त्याला अनेक पुरस्कारही मिळाले, यानंतर त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्याने 'सेक्टर 36' आणि 'द साबरमती रिपोर्ट' या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात काम केले आहे. तर त्याच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात आला होता.
'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विक्रांतने मुलाखतीत सांगितले की, चित्रपटादरम्यान सुरु असलेल्या वादामुळे त्याला अनेक धमक्या येत होत्या. या धमक्यांमध्ये त्याच्या त्याचा मुलाला लक्ष्य केले जात असल्याचेही त्याने या मुलाखतीमध्ये सांगितले.
मात्र कालचं 1 डिसेंबरला विक्रांत मस्सीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ही पोस्ट त्याच्या चाहत्यांसाठी अतिशय आश्चर्यकारक आहे. कारण विक्रांत आता अभिनयातून ब्रेक घेत इंडस्ट्री सोडण्याबद्दल त्याच्या पोस्टमध्ये म्हणत आहे. सध्या तो करिअमध्ये चांगलाच यशस्वी ठरत असतानाच विक्रांतने हा निर्णयय जाहीर करत आहे. त्यामुळे सगळे हैराण झाल असून विक्रांत आता पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून तसेच अनेक सेलिब्रेटीसने देखील कमेंटद्वारे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र 20 वर्षांच्या कारकिर्दीच्या या प्रवासात विक्रांतने अनेक भूमिका प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा चाहतावर्ग देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे.
विक्रांतने त्याच्या पोस्टमध्ये काय लिहील
"नमस्कार, गेली काही वर्ष अतिशय शानदार होती.... तुमच्या पाठिंब्यांसाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण मी जसजसा पुढे जात आहे, मला याची जाणीव होत आहे की, एक पती, वडील, मुलगा आणि एका अभिनेत्याच्या रुपात हीच वेळ पुन्हा सांभाळण्याची आणि घरी परतण्याची वेळ आहे.... 2025 या वर्षांत मी तुम्हाला शेवटचं भेटेन... जोपर्यंत पुन्हा योग्य वेळ येत नाही तोपर्यंत ही शेवटची भेट असेल... दोन शेवटचे चित्रपट आणि अगणित आठवणी, सर्व गोष्टींसाठी पुन्हा एकदा धन्यवाद...!" असं विक्रांत त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.