Virat Kohli: विराट आणि अनुष्का झाले दुसऱ्यांदा  आई वडील, 'हे' आहे बाळाचं नाव...

Virat Kohli: विराट आणि अनुष्का झाले दुसऱ्यांदा आई वडील, 'हे' आहे बाळाचं नाव...

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. अनुष्काने 15 फेब्रुवारी रोजी लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. बाळाचं नाव त्यांनी 'अकाय' (Akaay) असं ठेवलं आहे. त्यामुळे 'अकाय'चा अर्थ काय? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हिंदी शब्दकोशानुसार, 'अकाय' म्हणजे 'निराकार'. कोणताही आकार, रूप नसलेल्याला निराकार म्हणलं जातं. 'अकाय'चा एक अर्थ चंद्राचा प्रकाश असाही होतो.

विराट-अनुष्काने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की,15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचं अर्थात वामिकाचा लहान भाऊ 'अकाय'चं स्वागत केलं आहे. आमच्या आयुष्यातील या गोड क्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता". विरुष्कावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com