अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगलीच्यावतीने देण्यात येणारा आणि नाट्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा विष्णुदास भावे गौरवपदक पदक पुरस्कार जाहीर झाला आहे.

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी ही माहिती दिली आहे. रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबर रोजी सांगलीतील विष्णूदास भावे नाट्य विद्यामंदिर येथे प्रशांत दामले यांना सन्मानित करण्यात येणार आहे. रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलावंतांना विष्णूदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा समारंभाचे हे ५५ वे वर्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com