Maha Kumbh 2025: महाकुंभमध्ये सर्वांत सुंदर साध्वी कोण आहे? इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स, जुने व्हिडिओ, फोटो व्हायरल
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. या महा कुंभमेळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. विविध आखाड्यांमधील संत संगमच्या काठावर पोहोचले आहेत आणि महाकुंभाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. यादरम्यान निरंजनी आखाड्याच्या मिरवणुकीतील एका साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या साध्वीचे वर्णन महाकुंभातील सर्वात सुंदर साध्वी म्हणून केलं जात आहे.
या साध्वी म्हणून व्हायरल झालेल्या महिलेचं नाव हर्षा रिचारिया आहे. जी एक मॉडल, अँकर आणि अभिनेत्री होती. यशस्वी कारकिर्दीनंतर देखील तिने अध्यात्म किंवा हा मार्ग का निवडला? अशी तिच्याबद्दल चर्चा होत आहे. हर्षा रिचारिया यांनी या सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली.
शनिवारी महाकुंभमध्ये निरंजनी आखाड्याच्या मिरवणुकीत हर्षाला पाहिलं गेलं होतं. यावेळी ती इतर संतांसोबत रथात बसलेली दिसली. कुतूहलापोटी काही इन्फ्लुएन्सर, युट्यूबर्स आणि माध्यमांशी तिच्याशी संवाद साधला. “इतकी सुंदर दिसतानाही तू साध्वी का झालीस”, असा प्रश्न एकाने विचारल्यावर हर्षाने सत्य सांगितलं नव्हतं. उलट गेल्या दोन वर्षांपासून मी साध्वी बनली असून मला माझ्या आयुष्यात एक वेगळीच शांती अनुभवता येतेय, असं ती म्हणाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हर्षाचं सोशल मीडियावरील अकाऊंट पाहिलं. त्यावर तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये ती अँकरिंक करताना दिसतेय. हर्षाचा ग्लॅमरस अंदाजही नेटकऱ्यांना दिसला.
त्यानंतर एका टीव्ही चॅनलशी बोलताना हर्षाने स्पष्ट केलं, “मी साध्वी होण्याच्या दिशेने पावलं टाकतेय. मात्र मी अजून साध्वी झाली नाही. त्यासाठी एक दीक्षा घ्यावी लागते, अनेक विधी करावे लागतात. माझा पोशाख पाहून लोकांनी मला साध्वी असं म्हटलं. मला सर्वांत सुंदर साध्वी असं नाव दिलं गेलं. हे सर्व पाहून मला बरं वाटलं. पण मला साध्वी म्हणणं योग्य नाही, असं मला वाटतं. माझ्या गुरुदेवांनीही असा आदेश दिलेला नाही. त्यामुळे मला कृपया साध्वी म्हणू नका.”