Shreya Ghoshal : सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचे एक्स अंकाऊट हॅक

Shreya Ghoshal : सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचे एक्स अंकाऊट हॅक

सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचे एक्स अंकाऊट हॅक झाले; सोशल मीडियावर चाहत्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन.
Published by :
Team Lokshahi
Published on

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हीच्या बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. 13 फेब्रुवारीपासून श्रेयाचे एक्स अंकाऊट हॅक करण्यात आले आहे. सोशल- मीडियावर अपडेट करत श्रेयाने चाहत्यांना माहिती दिली. त्यासंदर्भात तिने इन्टाग्नामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये श्रेयाने प्रेक्षकांना अंकाऊटवरुन येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका अशी विनंती केली आहे.

काय आहे श्रेयाची पोस्ट

पोस्टमध्ये श्रेयाने लिहिले आहे की, "माझे एक्स अंकाऊट 13 फेब्रुवारीपासून हॅक करण्यात आले आहे. एक्सच्या टीमपर्यंत पोहोचण्याचा मी पर्यंत करत आहे. पण समोरुन उत्तर येत नाहीये. त्यामुळे मी माझे अंकाऊट डिलीटपण करु शकत नाही आहे."

श्रेया पुढे लिहिते की, " माझ्या एक्स अंकाऊटवरुन येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. खात्यावरचा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका ते सर्व फसवे आणि स्पॅम मेसेज असणार आहेत." अशी, विनंती श्रेयाने केली आहे.

पुढे श्रेया लिहिते की, अंकाऊट पुन्हा पुर्वपदावर आलं की, मी स्वता एक व्हिडिओ बनवून पोस्ट करेन तोपर्यत अंकाऊटवरुन येणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. असे गायिका श्रेया घोषालने केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com