यामी गौतमचे अभिमानास्पद पाऊल; लैंगिक अत्याचार पीडितांसाठी करणार काम

यामी गौतमचे अभिमानास्पद पाऊल; लैंगिक अत्याचार पीडितांसाठी करणार काम

Published by :

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) सिनेमात असंख्य वेगवेगळ्या भूमिका करत असते. तीच यामी आता आपल्या खऱ्य़ा आयुष्यात एक वेगळी भूमिका करतेय.या तिच्या भूमिकेचा आता सर्वानाच अभिमान असणार आहे. लैंगिक अत्याचार पीडितांना (sexual harassment) आधार देण्यासाठी यामीने एक पाऊल पुढे टाकले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) लैंगिक अत्याचार पीडितांना (sexual harassment) आधार देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. याविषयी बोलताना यामी म्हणाली की,"आज मी मोठ्या अभिमानाने सांगू इच्छिते की मी लैंगिक अत्याचार पीडितांच्या (sexual harassment) पुनर्वसनासाठी सक्रिय असणाऱ्या आणि सर्वतोपरी मदत करणाऱ्या अशा दोन अशासकीय संस्थांशी (एनजीओ) जोडून घेतले आहे. महिलांनी या समस्यांवर काम करण्याची आवश्यकता असून सुरक्षेच्या समस्या आजही अस्तित्वात आहेत. याविषयी प्रगती होत असली तरीही, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. या दोन एनजीओशी माझा संबंध ही सुरुवात असून भविष्यात सर्व स्तरातील महिलांच्या संरक्षणासाठी अधिक चांगल्या पद्धतीने मदत आणि योगदान देण्याची माझी इच्छा आहे."

हे एक विचार करायला लावणारे पाऊल आहे जे अभिनेत्री यामीने (Yami Gautam) उचलले आहे. प्रत्येक छोटेसे पाऊल समाजात मोठे बदल घडवून आणू शकते. आपल्या समाजात आजही महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा मोठ्या समस्या दूर करण्यासाठी तिने लोकांनाही पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com