Yuvraj Singh: युवराज सिंह दुसऱ्यांदा झाला बाबा; घरी आली चिमुकली परी

Yuvraj Singh: युवराज सिंह दुसऱ्यांदा झाला बाबा; घरी आली चिमुकली परी

क्रिकेटपटू युवराज सिंहला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
Published by  :
Team Lokshahi

टीम इंडियाचा धडाकेबाज माजी फलंदाज युवराज सिंह दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. युवराजने इन्स्टाग्रामवर त्याच्या दोन्ही मुलांसोबतचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. युवराज व हेजल कीच यांना या मुलीच्या आधी एक मुलगा देखील आहे. युवराजला गेल्या जानेवारी महिन्यात मुलगा झाला होता. त्यांनी त्याचे नाव ओरियन ठेवले आहे. त्यानंतर दीड वर्षातच आता मुलीचा जन्म झाला आहे.

युवराजने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पोस्ट शेअर करत त्याने लाडक्या राजकुमारीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने आपल्या लेकीचं नाव 'ऑरा' (Aura) असं ठेवलं आहे. युवराजने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"ऑराच्या येण्याने आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे". 'ऑरा'चा अर्थ वाऱ्याची झुळूक असा आहे.

क्रिकेटर युवराज सिंह 2016 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल हेजल कीचसोबत लग्नबंधनात अडकला. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. युवराज आणि हेजल 30 नोव्हेंबर 2016 मध्ये लग्नबंधनात अडकले. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर 25 जानेवारी 2022 रोजी त्यांना पहिला मुलगा झाला. युवाराज आणि हेजलच्या लाडक्या लेकाचं नाव ओरियन कीच सिंह आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com