Ashish Kapoor : टीव्ही अभिनेता आशिष कपूरला अत्याचाराच्या आरोपाखाली पुण्यातून अटक
(Ashish Kapoor) लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेला अभिनेता आशिष कपूर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतील एका पार्टीदरम्यान घडलेल्या घटनेनंतर पीडित महिलेने तक्रार नोंदवली होती.
तिच्या म्हणण्यानुसार, आरोपीने बाथरूममध्ये नेऊन जबरदस्ती केली. 11 ऑगस्टला गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी कपूरचा मागोवा घेत अखेर त्याला पुण्यातून अटक केली आहे. सुरुवातीला पीडितेच्या तक्रारीत इतर काही व्यक्तींचा उल्लेख होता, मात्र नंतरच्या निवेदनात फक्त आशिषवरच आरोप ठेवण्यात आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
दरम्यान, तक्रारदार महिलेने घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचा दावा केला असला तरी आतापर्यंत तपासात त्याबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही. सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांनुसार घटनेदरम्यान आशिष आणि महिला बाथरूममध्ये गेले होते. आशिष कपूरने सरस्वतिचंद्र, ये रिश्ता क्या कहलाता है, मोलक्की, देखा एक ख्वाब अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.