Dhananjay Pawar on Maharashtra Kesari Result : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील निर्णयाबद्दल, 'बिग बॉस' फेम धनंजय पोवार यांनी केली पोस्ट
बिग बॉस मराठी सीझन 5 ने रिल्सस्टार यांना नवीन ओळख मिळवून दिली आहे. त्यातील एक म्हणजे कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवार याला एक नवीन ओळख मिळवून दिली आहे. धनंजय आधीपासून चर्चेत होता परंतु त्यांने केलेल्या पोस्टमुळे तो आता पुन्हा चर्चेत आला आहे.
२ फेब्रुवारी रोजी 67 व्या महाराष्ट्र केसरी हा सामना झाला. या सामन्याला गालबोट देखील लागलं होत. या स्पर्धेत महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये अंतिम लढत पार पडली. या चुरशीच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ याने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. याच पार्श्वभूमीवर धनंजय पोवार यांने पोस्ट शेअर केली आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम निर्णायाबद्दल धनंजय पोवार लिहितो की, 'कोणत्याही गोष्टीच समर्थन नाही करत, पण निर्णय चुकलाय असे राक्षे यांचे मत आहे..त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे जे हाव भाव होते. ते एक खेळाडूला च समजतील इतकी वर्षे मेहनत करून असा पराभव कोणत्या खेळाडूला आवडेल' अशी स्टोरी ठेवत त्यांने चाहत्यांना तुम्हाला काय वाटते? असे विचारले आहे. त्या पोस्टमध्ये अन्याय झाला की न्याय झाला असे दोन पर्याय देत मते चाहत्यांना विचारले आहे. या पोस्टला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये न्याय झाला याला ३० टक्के, तर अन्याय झाला या पर्यायाला ७० टक्के मते पाहावयास मिळत आहे.