Shivani Sonar : राजा राणीची गं जोडीमधली अभिनेत्री शिवानी सोनार अडकली लग्नबंधनात
राजा राणीची गं जोडी मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार लग्नबंधनात अडकली आहे. शिवानी सोनार कर्लस मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेत प्रमुख भूमिका करत होती. अभिनेत्री शिवानी प्रत्येकांच्या घरात जाऊन पोहचली. तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गुपचुप साखरपुडा करुन शिवानी आणि अंबर हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचा सुखद धक्का चाहत्यांना दिला. शिवानीच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. शिवानी तिच्या लग्नाचे अपडेट वेळोवेळी चाहत्यांना पोस्टद्वारे देत होती. शिवानी आणि अंबर यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिवानी ही पारंपारिक हिरव्या नववारी साडीवर साजेसा गुलाबी रंगाचा शेला घेतल्याचे दिसत आहे. आणि अंबर गणपुले यांने कुर्ता आणि धोतर परिधान केले दिसते आहे. रिसेप्शनमध्ये शिवानी साऊथ इंडियन लुकमध्ये ,तर अंबर जोधपुरीमध्ये दिसत आहेत
शिवानी सोनी मराठीवरील भेटली तु नव्याने ही मालिकेमध्ये दिसत आहे तर, अंबरने स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये काम केले आहे. त्यानंतर कर्लस मराठीवरीस दुर्गा या मालिकेमध्ये काम करत होता. त्यामालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.