पहा, केजीएफ 2 चा टीझर रिलीज!

पहा, केजीएफ 2 चा टीझर रिलीज!

Published by :

सुपरस्टार यशच्या वाढदिवसाच्या दिवशी केजीएफ 2 चित्रपटाचा टीझर दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांच्या मागणीनुसार केजीएफ 2 चा पहिला टीझर होमबेल फिल्म्सच्या यू ट्युब वाहिनीवर प्रसिद्ध केला.

टीझरमध्ये काय? : सुरुवातीला आपल्याला रॉकीची आई आणि तिचे बालपण दाखवले आहे. त्याच्या आईने त्याला लहानाचं मोठं कसं केलं आणि कोणत्या परिस्थितीत तो मोठा झाला. तसंच त्याने दिलेलं वचन आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, 'केजीएफ चॅप्टर -1'ने बॉक्‍स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. यामुळे या चित्रपटाच्या सीक्‍वलची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. तसेच या चित्रपटाचा सिक्वल कन्नड, हिंदी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com