Pushpa2 Movie News: पुष्पा-2 चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान गोंधळ; मुंबई, सांगली, हैदराबादमध्ये प्रेक्षकांना त्रास

पुष्पा-2 चित्रपटादरम्यान मिरची पावडरची फवारणी; प्रेक्षकांना चित्रपटगृहात त्रास. या घटनेमुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट.
Published by :
Team Lokshahi

देशभरात पुष्पा-2 हा चित्रपट अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत होता अखेर काल तो रिलीज झाला. पुष्पा 2 चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ माजवला आहे. आता पुष्पा-2 चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचं ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

मुंबईत मिरची पावडरची फवारणी

पुष्पा-2 या चित्रपटादरम्यान मुंबईत मिरची पावडरची फवारणी करण्याच आलेली आहे. चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांना खोकला, घसा जळजळ होण्याचा त्रास जाणवू लागला. मुंबईतील गेटी गॅलेक्सी चित्रपटगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यादरम्यान पुष्पा-2 चित्रपटाचा शो वीस मिनिटे थांबवण्यात आला. तर पोलीसांकडून या घटनेसंदर्भात अधिकचा शोध सुरु आहे. त्यामुळे हा मिरची स्प्रे याठिकाणी कोणी मारला याचा शोध सुरु आहे.

सांगली, हैदराबादमध्ये गदारोळ

तर दुसरीकडे सांगलीत तिकीट मिळत नसल्याने दगडफेक करण्यात आली आहे. सांगलीमध्ये परिस्थिती सांभाळण्यासाठी पोलीसांकडून आक्रमता दाखवल्याचं पाहायला मिळालं दगडफेकमुळे काही जण जखमी झाल्याचं देखील सांगलीत आढळले आहेत. तर हैदराबादमध्ये अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाली आहे. ज्यामध्ये अनेक जण जखमी देखील झाले आहेत. त्यामुळे पुष्पा-2 चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान ठिकठिकाणी गोंधळ उडाल्याचं समोर आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com