Premachi Gosht2: सतीश राजवाडे पुन्हा एकदा घेऊन येणार जुन्या प्रेमाची नवी गोष्ट
ललित प्रभाकर हा चित्रपटसृष्टीचा लोकप्रिय अभिनेता आहे. 'आनंदी गोपाळ', 'चि.आणि चि.सौ.का' या चित्रपटातून मुख्य भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेच्या माध्यामातून तो घरोघरी पोहचला. ललित नेहमीच त्याच्या सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना काही ना काही अपडेट देत असतो. त्याने आता आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करत त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगितले आहे.
सोशलमीडिया पोस्ट करत त्याने 'प्रेमाची गोष्ट२' चित्रपट येणार असल्याचे सांगितले आहे. प्रेमाची गोष्टमध्ये आपण पाहिले असेल की, दोन घटस्फोटीत व्यक्तींना पुन्हा प्रेमात पाडण्याची भावनिक गोष्ट होती. त्यामुळे चित्रपटामध्ये नेमकं काय असणार, हे पाहण्यासाठी जूनपर्यंत वाट पाहावी लागणार.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सादर करत असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट २’या चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आहेत. सतिश राजवाडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे. याआधी सतीश राजवाडे आपल्या भेटीसाठी मुंबई- पुणे- मुंबई १, मुंबई- पुणे- मुंबई२, मुंबई- पुणे- मुंबई३, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते, यांसारख्या अनोख्या कथा घेऊन आले आहेत. या चित्रपटांमधील कलाकार अजून गुलदस्त्यात आहे.