Sunny Deol in Ramayana: "रामायण" चित्रपटात सनी देओल झळकणार 'या' भूमिकेसह!

Sunny Deol in Ramayana: "रामायण" चित्रपटात सनी देओल झळकणार 'या' भूमिकेसह!

सनी देओल 'रामायण' चित्रपटात महाबली हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
Published on

रामायण हे महाकाव्य केवळ भारतातचं नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. रामायणावर आधारित अनेक नाटकांचे प्रयोग, मालिका तसेच अनेक पुस्तक पाहायला मिळाले आहेत. परंतू आता रामायणाची कथा सांगण्यासाठी 'आदिपुरुष' नंतर आता 'रामायण' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी 'रामायण' हा चित्रपट घेऊन येत आहेत. यावेळी रामाणयात रणबीर कपूर श्रीरामाची भूमिका साकारणार आहे तर दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही सीतामातेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, त्याचसोबत यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

असं असताना आता बॉलिवूडमधील प्रभावशाली व्यक्तीरेखा असणारे सनी देओल हे "रामायण" चित्रपटात महाबली हनुमानाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासंबंधीत प्रभू श्रीराम, माता सीता आणि लंकाधीश रावणाची भूमिका सर्वांच्या समोर आली आहे. त्यामुळे आता सनी देओल हे बजरंगबली हनुमानाच्या भूमिकेत कसे असणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

सनी देओल हे बजरंगबली हनुमानाच्या भूमिकेत

एका मुलाखतीमध्ये सनी देओल म्हणाले की, रामायण हा एक मोठा प्रोजेक्ट आहे, याआधी 'रामायण'वरील काही सिनेमांवर टीकाही झाली आहे. खरं सांगायचं तर मला खात्री आहे की हा सिनेमा खूप चांगला होणार आहे "तुम्हाला सिनेमा स्पेशल इफेट्सही बघायला मिळतील. या घटना खरोखरंच घडल्या आहेत असाच भास होईल. 2025 मध्ये 'रामायण'चा पहिला भाग आणि 2026 मध्ये दुसरा भाग रिलीज होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com