India
Gold and Silver rate today: पहा आजचे सोन्याचांदीचे दर
सोन्या-चांदीच्या गेल्या काही दिवसांपासून भावात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचा भावत १००० रुपये वाढ तर इतर दिवशी सोन्याच्या किमतीत सातत्याने घट झाली आहे. चांदीचा भावात १००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्याचा सोन्याचा भाव ४५ हजार १०० वर गेला आहे तर चांदीचा भाव हा ६४ हजार ७०० आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे तसेच अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

