Business
Gold Price | सोन्याच्या किंमतीत वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेजीमुळे, भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदविण्यात आली. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीही आज वाढल्या. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,339 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 68,784 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमती वाढल्या तर चांदीच्या किंमतींमध्ये कोणताही विशेष बदल झाला नाही. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात प्रति 10 ग्राममागे केवळ 69 रुपयांची वाढ नोंदली गेली. 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याची नवीन किंमत आता राजधानी दिल्लीत प्रति 10 ग्रॅम 46,408 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत 1,793 डॉलर प्रति औंस झाली.