Business
Gold Rate Today | सोन्याच्या किंमतीत घसरण
राष्ट्रीय राजधानीत गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 339 रुपयांनी घट झाली. यामुळे दिल्लीतील सोन्याची किंमत दहा ग्रॅम 48,530 रुपयांवर आली. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 48,869 रुपये होता. जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीतील घसरणीचा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून आला आहे ,असे तज्ञाचे मत आहे.