शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांची सारवासारव, म्हणाले इतिहासातील नवीन तथ्य….
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी एका जाहीर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून मोठा वाद पेटला आहे. अनेकांनी राज्यापालांच्या निषेध केला होता.तर काहींनी आंदोलने ही केली होती. आता या प्रकरणात भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे.
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. या विधानावरून मोठा वाद पेटला होता. राजकीय वर्तुळातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात होता. या विधानावर कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहे. माझा माहिती व अभ्यासाप्रमाणे समर्थ रामदास जी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. पण इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल, असे विधान करत त्यांनी हा वाद शमवण्याचा प्रयत्न केला.
राज्यापाल काय म्हणाले होते ?
"चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, 'या राज्याची चावी मी तुम्हाला देतो' त्यावर समर्थ म्हणाले की, 'ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात",