Chia Seed Benefits
Chia Seed Benefits

Chia Seed Benefits: वजन कमी होण्यासाठी चिया सिड्स खरंच जादुई? जाणून घ्या

Weight Loss Facts: चिया सिड्स वजन कमी करण्यासाठी लोकप्रिय झाले असले तरी ते जादूई उपाय नाहीत, असे पोषणतज्ञ सांगतात. फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि खाण्यावर नियंत्रण मिळते.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आजकाल चिया सिड्स हे अनेक सुपरफूड्स ट्रेंडमध्ये आहेत कारण ते प्रथिने, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. लोक चिया बियांचा वापर शेक, स्मूदी आणि दह्यात करून पॉवर-पॅक स्नॅक्स तयार करतात. हृदयाचे आरोग्य राखणे, रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे, त्वचेचे स्वास्थ्य सुधारणा करणे आणि शरीरातील ऊर्जा पातळी वाढवणे यासाठी चिया बिया उपयुक्त आहेत. मात्र, बहुतेक लोक त्यांचा वापर वजन कमी करण्यासाठी करतात. ते खरोखरच वजन कमी करण्यात मदत करतात की ते फक्त एक ट्रेंड आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. पोषणतज्ञ रिद्धी पटेल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये या विषयावर तपशीलवार माहिती दिली आहे.

पोषणतज्ञांच्या मते, या प्रश्नाचे हो किंवा नाही असा सोपा उत्तर नाही. काही लोकांना वाटते की चिया सिड्स जादूने चरबी जाळून शरीरातून बाहेर टाकतील, पण तसे नाही. मात्र, ते फायबरने समृद्ध असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे जास्त खाण्यापासून वाचवते आणि वजन कमी करण्यास मदत होते. पण वजन कमी करणे पूर्णपणे आहारावर अवलंबून असते. जर तुम्ही भरपूर साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ खात असाल, तर चिया सिड्स ने तुम्हाला जास्त फायदा होणार नाही.

Chia Seed Benefits
Winter Health: हिवाळ्यात वारंवार सर्दी, खोकला होतोय? घरच्या घरी बनवा हा गुणकारी आयुर्वेदिक काढा

पोषणतज्ञांच्या मते, चिया बिया एक महत्त्वाचे सुपरफूड असून, त्यामध्ये अनेक पोषक तत्त्वे आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असतात, जे आतड्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. मात्र त्यांना जादूई वजन कमी करणारे पूरक समजून न खाता निरोगी आहाराचा एक भाग म्हणून समाविष्ट करणे गरजेचे आहे. केवळ चिया सिड्स खाल्ल्यानेच वजन कमी होणार नाही, योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल केल्यासच त्यांचा योग्य उपयोग होऊ शकतो.

Chia Seed Benefits
Health Security Cess: गुटखा-पान मसाला उत्पादकांवर बंदी घालण्याची तयारी सुरू, सरकार संसदेत नवीन सेस विधेयक मांडणार
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com