Winter Skin Care
Winter Skin Care

Winter Skin Care: घरच्या घरी बनवा 'हा' नाईट सिरम, चेहरा दिसेल चमकदार

Homemade Beauty: घरच्या घरी तयार केलेला नैसर्गिक नाईट सीरम त्वचेला हायड्रेशन आणि पोषण देतो.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थंडीच्या दिवसात स्वच्छ, निरोगी आणि चमकदार चेहरा असावा ही आजकाल प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र, बाहेरील वातावरण, प्रदूषण तसेच अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी व ताणतणाव यामुळे आपल्या त्वचेवर परिणाम होतो. बरेच लोक बाजारात “नैसर्गिक” असा लेबल असलेली महागडी सीरम, क्रीम व विविध स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतात. त्यांना वाटते की “नैसर्गिक” लिहिलेले प्रॉडक्ट्स खऱ्या नैसर्गिक घटकांनी बनलेले असतात, पण असे नेहमीसाठी खरे नसते. काही बनावट प्रॉडक्ट्स इतके फसवे असतात की त्यांच्या वापराने त्वचेला फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो.

Winter Skin Care
Winter Health: हिवाळ्यात वारंवार सर्दी, खोकला होतोय? घरच्या घरी बनवा हा गुणकारी आयुर्वेदिक काढा

खरे नैसर्गिक घटक का आहेत का यावर विश्वास ठेवण्यासाठी आपण त्यांना स्वतःदेखील तयार करू शकतो. घरगुती काही सोपे घटक वापरून नैसर्गिक नाईट सीरम तयार करून त्वचेची काळजी घेता येते. या नाईट सीरमच्या वापराने काही दिवसांत त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसते.

Winter Skin Care
Health Security Cess: गुटखा-पान मसाला उत्पादकांवर बंदी घालण्याची तयारी सुरू, सरकार संसदेत नवीन सेस विधेयक मांडणार

आजकाल अनेक प्रॉडक्ट्समध्ये बनावट नैसर्गिक घटकांचा वापर होतो आणि लोकांना योग्य उत्पादन निवडण्यास कठीण होते. त्यामुळे घरच्या घरी नैसर्गिक उपाय करणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकते. अशा प्रकारच्या नाईट सीरममध्ये नैसर्गिक तेलांचे, मध, आणि इतर अन्नघटकांच्या मदतीने त्वचेची स्वच्छता आणि आरोग्य सुधारता येते. थंडीच्या हंगामात त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी हा उपाय सर्वांसाठी उपयुक्त आहे. असे नैसर्गिक उत्पादन वापरल्यास त्वचेला कोणताही नुकसान होणार नाही आणि दीर्घकालीन फायदा मिळू शकतो.

स्वतःच्या त्वचेसाठी तयार केलेला नैसर्गिक नाईट सीरम हा त्वचेला हायड्रेशन देतो, तिचे पोषण करतो आणि त्वचेतील ताणतणाव कमी करतो. यामुळे चेहरा तजेला प्राप्त होऊन पैकीच झीज कमी होते. घरच्या घरी सहज बनवता येणार्‍या या उपायांनी त्वचेची नैसर्गिक सुंदरता टिकवून ठेवणे शक्य आहे.

नाईट सीरम बनवण्यासाठी फक्त खालील घटकांची आवश्यकता

  • कोरफड जेल

  • बीट रस

  • गुलाब पाणी

  • ग्लिसरीन

कसे बनवायचे?

स्वच्छ वाटीत एक चमचा कोरफड जेल घ्या. त्यात थोडासा बीटाचा रस, काही थेंब गुलाबपाणी आणि थोडे ग्लिसरीन मिसळा. घटक एकजीव होईपर्यंत नीट मिक्स करा. झोपण्यापूर्वी चेहरा व मानेवर लावा. हे घरगुती नाईट सीरम त्वचेला रात्रभर पोषण देईल आणि सकाळी ताजेतवाने वाटेल.

नाईट सीरमचे फायदे कोणते?

बीट त्वचेला नैसर्गिक गुलाबी टोन देते, तर कोरफड त्वचेवरील डाग, जळजळ आणि मुरुमांचे डाग कमी करते. गुलाबपाणी चेहरा ताजेतवाने बनवते आणि ग्लिसरीन रात्रभर त्वचा मऊ ठेवते. नियमित वापर केल्यास हा घरगुती नाईट सीरम चेहरा स्वच्छ, मऊ आणि तेजस्वी बनवतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com