Burn Skin: हात भाजल्यावर ताबडतोब करा 'हे' घरगुती उपाय

Burn Skin: हात भाजल्यावर ताबडतोब करा 'हे' घरगुती उपाय

हात भाजल्यानंतर नक्की काय करायचं हे कधी कधी कळत नाही. मात्र असे अनेक घरगुती उपाय आहेत जे करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. त्यासाठी हा लेख नक्की वाचा.
Published by  :
Team Lokshahi

घरगुती काम करताना, जेवण बनविताना किरकोळ भाजले तर घरगुती उपाय करावे. तिसऱ्या किंवा चौथ्या डिग्रीच्या बर्न्ससाठी त्वरित रुग्णालयात घेऊन जावे. भाजल्यावर त्वरित लावण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत चला तर जाणून घेऊयात हे उपाय.

1. भाजल्यावर ठंड पाणी घाला – घरात काम करताना, तव्यावर चपाती- भाकरी करताना, कुकरला अचानक हात लागताना हाताला भाजते. अशा वेळी हात पटकन साधारण वीस मिनिटे तरी थंडपाण्यात ठेवावा किंवा नळाखाली पकडावा. नतर भाजलेली जखम स्वच्छ सौम्य साबणाने आणि पाण्याने धुवा.

2. व्हिनेगरचा वापर करा – भाजलेल्या ठीकाणी लावण्यासाठी व्हिनेगर हा उत्तम घरगुती उपाय आहे. हा घटक जखमेवर जंतुनाशक आनी तुरटी म्हणून काम करतं. भाजलेल्या जखमेवर कोणत्याही प्रकारचे संक्रमण होऊ शकत नाही. व्हिनेगर जखमेवर लावण्यापूर्वी पाण्यासोबत समप्रमाणात एकत्र करुन घ्या. नंतर स्वच्छ कापड घेऊन तयार केलेल्या व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणात बुडवून भाजलेल्या जखमेवर ठेवा. वेदना कमी करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे. थोड्या थोड्या वेळाने कापड बदलू शकता.

3. मध वापरा – भाजल्यावर त्वचा बरी करण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे मध. या मध्ये ऍंटीफंगल्स, ऍटीबॅक्टेरियल आणि ऍटीइंप्लेमेटरी गुणधर्म असल्याने भाजलेल्या जखमेच्या किरकोळ वेदना कमी करतात.

4. कोरफड अथवा एलोविरा जेल लावा – कोरफड हा उत्तम घरगुती उपाय आहे. भाजलेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी प्रभावी ठरते कोरफड. घरी कोरफड नसेल तर बाजारातून एलोविरा जेल मिळते त्याचा वापर करावा. या मध्ये ऍटिइनप्लमेट्री असल्याने ते सर्क्युलेशन वाढवते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते.

5. थंड पाण्याने शेकावे – भाजलेल्या जखमेवर थंड पाण्याचा शेक दिल्याने सूज दूर होते. पाच ते दहा मिनिटाच्या अंतराने थंड पाण्याचा शेक द्या. अति थंड किंवा बर्फाचा वापर शक्यतो टाळावा. असे केल्यास आराम मिळण्याएवजी जखमेवर जळजळ होऊ लागेल.

6. उन्हात जाऊ नका – भाजल्यावर कडक उन्हात जाणे टाळा. त्वचेवर डायरेक्ट सूर्यकिरण पडणार नाहीत याची काळजी घ्या. एकाद्या तलम कपड्याने जखम झाकून ठेवा त्याने जळजळ होणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com