Work Stress Relief
REFRESH YOUR BODY AND MIND: SIMPLE TIPS TO RELIEVE WORK FATIGUE AND STRESS

Work Stress Relief: डेस्कवर बसून काम करताना थकवा येतो? 'या' टिप्सने मिळवा रिफ्रेशमेंट

Mental Wellness: सुट्टीच्या दिवशी सोप्या टिप्स फॉलो करून मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करा; योग, छंद, निसर्गातील वेळ आणि मसाजसारख्या उपायांनी ऊर्जा आणि मूड ताजेतवाने राहील.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, बिघडलेले मानसिक आरोग्य, पोषक घटकांची कमतरता आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. एकजागेवर बसून तासनतास काम करत राहिल्यामुळे केवळ शारीरिक आरोग्याचं नाहीतर मानसिक आरोग्य सुद्धा बिघडते. त्यामुळे शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते.

आठवड्याभराच्या धावपळीनंतर थकवा आणि मानसिक ताण जाणवतो. यामुळे शरीराला आणि मनाला विश्रांतीची आवश्यकता असते. सुट्टीच्या दिवशी खूप थकल्यासारखं वाटते आणि आपण झोपून राहतो. अशावेळी तुम्ही स्वत ला रिफ्रेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही सोप्या गोष्टी केल्यास तुम्हाला पुन्हा एकदा कामासाठी ऊर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटते. सुट्टीच्या दिवशी काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचा आठवड्याभराचा थकवा झटक्यात दूर होईल.

छंद जोपासा:

धावपळीमुळे आठवडाभर आपल्याला कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणून सुट्टीच्या दिवशी तुमचा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. जसे की, वाचन, गाणी ऐकणे, चित्रकला, स्विमिंग, इत्यादी. आवडीच्या गोष्टी केल्याने डोपामाइन नावाचे हॅपी हॉर्मोन सक्रिय होते. यामुळे मूड फ्रेश होतो आणि मानसिक ताण खूप कमी होतो.

हलका व्यायाम, योगासने:

सुट्टीचा दिवस पूर्णपणे आराम करण्यात जातो. मात्र झोपून राहिल्याने जास्त थकवा जाणवतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी हलका व्यायाम आणि योगा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्ट्रेचिंग, पुशअप्स, सूर्यनमस्कार करू शकता. योगासने केल्याने शरीर मोकळे होते. तसेच ध्यान केल्याने एकाग्रता वाढते आणि ऊर्जा टिकून राहते.

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा:

सुट्टीच्या दिवशी घरातच बसून राहण्यापेक्षा जवळच्या एखाद्या बागेत, टेकडीवर किंवा मोकळ्या मैदानात फिरायला जा. हिरवळ आणि शुद्ध हवा मानसिक थकवा दूर करण्यासाठी सर्वोत्तम ठरते. तसेच कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवल्याने तुमचा मूड सुधारतो. त्यानुसार तुम्ही लाँग ड्राइव्ह, मूव्ही किंवा डिनरसाठी देखील जाऊ शकता.

स्पा किंवा मसाज करा:

जर तुम्हाला आठवड्याचा थकवा दूर करायचा असेल तर सुट्टीच्या दिवशी मसाज किंवा स्पा ट्रीटमेंट घेऊ शकता. यामुळे खूप जास्त प्रमाणात रिलॅक्स वाटते. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा. शक्य असल्यास अंघोळीपूर्वी शरीराला तेलाने मसाज करा. यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि स्नायूंचा ताण कमी होतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com