मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

सध्या देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सध्या देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत साखरेचा हा गंभीर आजार झपाट्याने वाढत आहे. एकदा मधुमेह झाला की त्यातून सुटका होणे कठीण होते. आपल्या दैनंदिन जीवनात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत, जे साखरेची पातळी नियंत्रित किंवा वाढवण्याचे काम करतात.

अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील साखरेचे रुग्ण असाल तर तुम्ही या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. मधुमेहाच्या आजारादरम्यान, रुग्णाने त्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा, हा आजार तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या सेवनाने तुमची साखरेची पातळी वाढू शकते.

मधुमेहाच्या रुग्णाने कोणत्या गोष्टी खाऊ नयेत

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्याही प्रकारच्या गोड पदार्थापासून दूर राहावे.

चहामध्ये साखर, गूळ, मध यापासून अंतर ठेवा.

जेवणात जास्त मीठ खाऊ नये.

मधुमेहाच्या रुग्णांनी थंड पेय पिणे टाळावे.

आईस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅक केलेले ज्यूस देखील तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

जास्त जंक फूड किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा

मधुमेहात काय खावे?

मधुमेहाच्या रुग्णांना ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो.

तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुरू करू शकता.

जेवणात कच्ची केळी, लिची, डाळिंब, एवोकॅडो आणि पेरू यांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

मधुमेहाचे रुग्ण त्यांच्या आहारात कमी चरबीयुक्त दही आणि दुधाचा समावेश करू शकतात.

दूध प्या आणि रोज ड्रायफ्रुट्स खा.

येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com