Make Soft And Fluffy Millet Flour Idlis This Winter Simple Breakfast Recipe
Make Soft And Fluffy Millet Flour Idlis This Winter Simple Breakfast Recipe

Make Soft And Fluffy Millet Flour Idlis : हिवाळ्यात मऊ, हलकी आणि फायबरयुक्त बाजरी इडली – घरच्या घरी साधी, स्वादिष्ट आणि हेल्दी!

बदलत्या हवामानात शरीर गरम ठेवणारे आणि ताकद देणारे पदार्थ खाणं फार गरजेचं असतं. यासाठी बाजरीपासून तयार होणारी इडली हा एक उत्तम पर्याय आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थंडीच्या दिवसांत सकाळी भूक जरा जास्तच लागते.अशावेळी पोटभर आणि पौष्टिक नाश्ता मिळाला तर दिवसभर उत्साह टिकतो. बदलत्या हवामानात शरीर गरम ठेवणारे आणि ताकद देणारे पदार्थ खाणं फार गरजेचं असतं. यासाठी बाजरीपासून तयार होणारी इडली हा एक उत्तम पर्याय आहे.

दक्षिण भारतीय चवीची मऊ इडली वजन कमी करणाऱ्यांसाठीही फायदेशीर ठरते. ती तेलकट नसते, हलकी असते आणि जास्त वेळ पोट भरलेलं ठेवते. बाजरीत फायबर, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असल्याने आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.

लागणारे साहित्य

बाजरीचे पीठ, रवा, दही, मीठ, मोहरी, उडीद डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, बेकिंग सोडा किंवा इनो, तेल

बनवण्याची सोपी पद्धत

  • एका भांड्यात बाजरीचे पीठ आणि रवा एकत्र करा. त्यात दही आणि थोडं पाणी घालून मऊसर पीठ तयार करा व काही वेळ झाकून ठेवा.

  • कढईत तेल गरम करून मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करा व ती पिठात मिसळा.

  • शेवटी बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने ढवळा.

  • इडलीच्या साच्यांना तेल लावून मिश्रण ओता आणि 15–20 मिनिटे वाफवा.

  • गरमागरम, मऊ आणि पौष्टिक बाजरीची इडली तयार! चटणीसोबत खा आणि दिवसाची सुरुवात हेल्दी पद्धतीने करा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com