Money Plant Tips : मनी प्लांट लावलं तरी पैसे येत नाहीत? जाणून घ्या नेमक्या ‘या’ चुका
वास्तुशास्त्रानुसार घरात झाडं व रोपं लावणे खूप चांगले मानले जाते. हिरवी रोपे ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, आणि यात मनी प्लांट हा विशेष स्थान आहे कारण नावाप्रमाणे तो संपत्ती आकर्षित करणारी वनस्पती मानली जाते. वास्तुनियमांचे पालन करून मनी प्लांट लावल्याने आर्थिक स्थिरता टिकते, पण चुकीच्या पद्धतीमुळे अपेक्षित लाभ मिळत नाहीत.
वास्तुशास्त्रानुसार घराची आग्नेय दिशा, म्हणजेच आग्नेय कोपरा मनी प्लांटसाठी सर्वोत्तम आहे, जेथे लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. ईशान्य दिशेला मनी प्लांट लावणे टाळा, कारण यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात. वेल वरच्या दिशेने वाढेल याची काळजी घ्या, जमिनीला स्पर्श होणार नाही हे पाहा, आणि सुके किंवा पिवळी पाने नियमित काढून टाका.
अनेकांना मनी प्लांट चोरून लावणे चांगले वाटते, पण हे चुकीचे आहे. तो घरातच लावा, बाहेर नाही; अंधारलेल्या जागेत किंवा बाथरूमजवळ ठेवू नका. काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात लावल्यास समृद्धी वाढेल. निसर्गाची काळजी घेतल्यास तोही तुमची काळजी घेईल, आणि वास्तुनुसार सुख-समृद्धी प्राप्त होईल.
