Menstrual pain: पीरियड्समध्ये होणाऱ्या हेवी फ्लोमुळे त्रस्त आहात? मग यावर "हे" उपाय नक्की ट्राय करा

Menstrual pain: पीरियड्समध्ये होणाऱ्या हेवी फ्लोमुळे त्रस्त आहात? मग यावर "हे" उपाय नक्की ट्राय करा

पीरियड्समध्ये होणाऱ्या हेवी फ्लोमुळे त्रस्त आहात? मग हेवी फ्लो कमी करण्यासाठी हे सोपे आणि प्रभावी उपाय नक्की ट्राय करा. जाणून घ्या अधिक माहिती.
Published by :
Team Lokshahi
Published on

नियमित आणि चार-पाच दिवसांसाठी येणारी मासिक पाळी हे स्त्री आरोग्यासाठी खर तर वरदान असते पण हीच पाळी जर लवकर म्हणजे चार आठवड्याऐवजी तीन आठवड्यांनी किंवा पंधरा-पंधरा दिवसांनी येऊ लागली किंवा चार-पाच दिवसांऐवजी आठवडा - पंधरा दिवस अंगावरून जाऊ लागलं तर होणारा त्रास ती स्त्रीच जाणे. हार्मोनल असंतुलन मुळापासून बरा होण्यासाठी नेमके उपचार होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी तज्ञ वैद्यांकडून नाडी परीक्षण करून घेणं सर्वोत्तम असतं पण त्या बरोबरीने घरच्या घरी हा एक साधा उपाय करता येऊ शकतो.

जेष्ठमध ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची असते. आयुर्वेदिक औषध मिळणाऱ्या कोणत्याही दुकानात जेष्ठमधाच्या काड्या सहज मिळू शकतात. या उपचारासाठी सर्वप्रथम तांदळाचं धूवण तयार करावं लागत. यासाठी दोन ते तीन चमचे तांदूळ अर्धा कप पाण्यात रात्रभर भिजत घालावे. सकाळी हातानी थोडं कुस्करून वरचं पाणी वेगळं केलं की तांदळाचं धूवण तयार होईल.

आता सहाणेवर थोडं थोडं तांदळाचे धुवण घेऊन त्यात जेष्ठमध उगाळावं आणि एक चमचा पेस्ट तयार करावी. यातच अर्धा चमचा खडी साखरेचं चूर्ण मिसळावं आणि सकाळी अनशापोटी हे मिश्रण घ्यावं. वरून उरलेलं तांदळाचे धूवण प्यावं. मासिक पाळीचे चार-पाच दिवस वगळता, एरवी तीन-चार महिन्यांसाठी सलग हा उपचार करता येऊ शकतो. पाळी लवकर येणं, अंगावरून अधिक दिवस आणि अति प्रमाणात जाणं या तक्रारींवर या उपचाराचा उपयोग होताना दिसतो.

आजकाल रजोनिवृत्तीच्या दिवसात म्हणजे स्त्रियांच्या जीवनातील मासिकपाळी बंद होतो त्या काळात थोडाही त्रास होऊ लागला, रक्तस्त्राव थांबत नाही असं दिसलं तर पटकन गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय घेतला जातो. पण स्त्री आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा अवयव गमावणं नंतर स्त्रीसाठी खूप त्रासदायक ठरू शकतं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com