हिवाळ्यात तूप खाण्याचा सल्ला देण्यात येतो. हिवाळ्यात तूप खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. तुपाचे सेवन केल्याने आतड्यांचे आरोग्य आणि पचन सुधारते. तुपातील पोषक तत्त्वे गॅस्ट्रिक पचन सुधारण्यास मदत करतात. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये एंजाइम असतात, जे अन्नाला साध्या संयुगांमध्ये मोडण्यास मदत करतात.
पाचा उच्च स्मोक पॉइंट थंड हवामानात स्वयंपाक करण्यासाठी आदर्श ठरतो. त्याची चव आणि सुगंध देखील इतका चांगला असतो की, जेवणाची चव दुप्पट होते. तुपामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत, ते सर्दी आणि खोकला बरे करण्यासाठी प्रभावी आहेत.
जेव्हा तुम्ही त्वचेवर तूप लावता तेव्हा ते त्वचेच्या पडद्याला आतून आणि बाहेरून आर्द्रता प्रदान करतं. तूप हे आवश्यक फॅट्सचे बनलेले असते. कोमट शुद्ध गाईच्या तुपाचे काही थेंब नाकपुडीत टाकल्यास त्वरित आराम मिळू शकतो.