Heart Attack
HEART ATTACK AT HOME ALONE: 5 LIFE-SAVING STEPS, SYMPTOMS, AND EMERGENCY TIPS

Heart Attack: घरात एकटे असताना अचानक हार्ट अटॅक आला तर...? ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

Life Saving Steps: घरात एकटे असताना हार्ट अटॅक आल्यास त्वरित १०८ कॉल करा, अॅस्पिरिन चावा, आरामदायी स्थितीत बसा आणि कुटुंबाला कॉल करा.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) ही गंभीर समस्या झपाट्याने वाढत असून, विशेषतः ४० वर्षांखालच्या तरुणांमध्ये २५ ते ३० टक्के प्रमाण जास्त आहे. हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा येऊन ऑक्सिजन पुरवठा खंडित होणे म्हणजे हार्ट अटॅक, जो थेट मृत्यूला निमंत्रण देऊ शकतो. अनेकदा अचानक हल्ला होतो आणि घरी एकटे असताना योग्य उपाय न माहीत असल्याने जीव धोक्यात येतो. अमेरिकन हृदयरोगतज्ज्ञ आणि सर्जन डॉ. जेरेमी लंडन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, घाबरून न जाता हे ५ सोपे पाऊल उचलल्यास जीव वाचवता येईल.

हार्ट अटॅकची लक्षणे ओळखून ताबडतोब कारवाई करा. ही लक्षणे आहेत :

छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला तीव्र वेदना होणे.

श्वास घेण्यास त्रास होणे आणि धाप लागणे.

अचानक खूप जास्त घाम येणे.

अस्वस्थ वाटणे आणि चक्कर येऊन पडल्यासारखे वाटणे.

घरात एकटे असताना हार्ट अटॅक आल्यास हे ५ उपाय करा :

आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा : वेळ पाहू नका, ताबडतोब १०८ वर कॉल करा आणि स्थिती सांगा. ते व्हॅन पाठवतील.

अॅस्पिरिनची गोळी चावून खा : डायरेक्ट गिळू नका, हळूहळू चावून खा. ही तीव्रता कमी करते.

घराचे दरवाजे उघडा आणि लाईट चालू करा : आजूबाजूचे लोक सहज आत येऊ शकतील आणि मदत करतील.

बसा किंवा झोपा : जमिनीवर पडून दुखापत होऊ नये म्हणून बेड किंवा सोफ्यावर आरामदायी स्थितीत राहा.

कुटुंब किंवा मित्रांना कॉल करा : फोनवर बोलत राहा जेणेकरून ते तुमच्या स्थितीची माहिती घेतील आणि मदतीला धावतील.

हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणामुळे जनजागृती आवश्यक आहे. हे सोपे उपाय वेळीच केल्यास मृत्यू टाळता येतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि तणावमुक्त जीवनशैलीने हार्ट अटॅक टाळा, असा सल्ला डॉक्टर देतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com