Daily Horoscope 1 August Rashi Bhavishya: 'या' राशीने निर्णय घेताना  विचार करावा; पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope 1 August Rashi Bhavishya: 'या' राशीने निर्णय घेताना विचार करावा; पाहा तुमचे भविष्य

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : व्यापारात नफा होईल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. कार्य-क्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेऊ नका तुमची बदनामी होऊ शकते. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल.

वृषभ (Taurus Horoscope Today) : प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घ्या. आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. काही नवे मित्र जोडाल. अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात. जोडीदार तुम्हाला आज जाणूनबुजून दुखावेल.

मिथुन (Gemini Horoscope Today) : नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात. अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे तुमचे दिवसभराचे बेत रखडतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल.

कर्क (Cancer Horoscope Today) : काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल.

Daily Horoscope 1 August Rashi Bhavishya: 'या' राशीने निर्णय घेताना  विचार करावा; पाहा तुमचे भविष्य
घरात मांजरीचे आगमन शुभ की अशुभ, जाणून घ्या 'या' संकेतांवरून

सिंह (Leo Horoscope Today) : दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळवा. आर्थिक बचत करा. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा.

कन्या (Virgo Horoscope Today) : तुम्ही अस्वस्थ व्हाल. मिळकत वाढवण्याचा प्रयत्न करा. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस खूपच चांगला. तुमचा मूडही बदलेल आणि तुमच्या दोघांतील गैरसमज दूर होईल. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या आणि आपल्या कल्पनादेखील मांडा. कुटुंबाला अधिक वेळ दिला पाहिजे.

तूळ (Libra Horoscope Today) : कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी विचार करा. प्रलंबित देणीमुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : ताणतणावातून थोडे मुक्त व्हाल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळेल.

धनु (Sagittarius Horoscope Today) : छोट्या-मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता. कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा.

मकर (Capricorn Horoscope Today) : आर्थिक दृष्ट्या आज दिवस चांगला राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होईल. प्रेमाचा आनंद घेता येईल. वेब डिझाईनर्ससाठी आजचा उत्तम दिन आहे. कामावर लक्ष केंद्रीत करा. काहींना परदेशी जाण्याच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : कोर्ट-कचेरीत विजय मिळेल. धन लाभ होतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.

मीन (Pisces Horoscope Today) : कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दु:ख देईल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com