यंदा दिव्यांचा सण पाच नव्हे सहा दिवस चालणार; जाणून घ्या दिवाळीच्या सर्व तारखा

यंदा दिव्यांचा सण पाच नव्हे सहा दिवस चालणार; जाणून घ्या दिवाळीच्या सर्व तारखा

दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो.

Diwali 2023 : दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक अमावस्या तिथीला, भगवान श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर आणि लंका जिंकून अयोध्येत परतले, या आनंदात अयोध्येतील सर्व लोकांनी आपला राजा प्रभू रामाचे स्वागत करण्यासाठी दिवे लावून हा दिवस साजरा केला. त्यामुळे ही परंपरा तेव्हापासून सुरू आहे.

यंदा पाच दिवसांचा दिवाळी सण हा सहा दिवसांचा असेल. यावेळी भुग्त भोग्य यानिमध्ये वाढ किंवा घट झाल्यामुळे दिवाळीचा सण ६ दिवसांचा असेल. यावेळी गुरुवार ९ नोव्हेंबर रमा एकादशी आणि वसुबारस दिवाळीचा सण सुरू होईल. शुक्रवारी १० नोव्हेंबर २०२३ रोजी धनत्रयोदशीपासून, रविवार १२ नोव्हेंबर २०२३ रोजी लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी, १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सोमवती अमावस्या, मंगळवार १४ नोव्हेंबर २०२३ रोजी दीपावली पाडवा आणि १५ नोव्हेंबर २०२३ बुधवारी भाऊबीज या उत्सवाची समाप्ती होईल.

दिवाळी सणाच्या तारखा

रमा एकादशी आणि वसुबारस - ९ नोव्हेंबर

धनत्रयोदशी- १० नोव्हेंबर

लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी - १२ नोव्हेंबर

सोमवती अमावस्या - १३ नोव्हेंबर

दीपावली पाडवा - १४ नोव्हेंबर

भाऊबीज - १५ नोव्हेंबर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com