गणेश विसर्जनाच्या 'या' शुभ मुहूर्तावर बाप्पाला द्या निरोप; सर्व दुःख, संकटे होतील दूर

गणेश विसर्जनाच्या 'या' शुभ मुहूर्तावर बाप्पाला द्या निरोप; सर्व दुःख, संकटे होतील दूर

गणेश चतुर्थीपासून 10 दिवस धामधुमीत गणेशोत्सव सुरू असतो आणि दहाव्या दिवशी गणेश विसर्जन होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे ते जाणून घेऊया.

Ganpati Visarjan : हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला भगवान गणेशाचा जन्म झाला. यंदा १९ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. देशभरात थाटामाटात गणपतीची स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीपासून 10 दिवस धामधुमीत गणेशोत्सव सुरू असतो आणि दहाव्या दिवशी गणेश विसर्जन होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे ते जाणून घेऊया.

गणेश विसर्जनासाठी शुभ मुहूर्त

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 27 सप्टेंबर रोजी रात्री 10.18 वाजता सुरू होईल आणि 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 06.49 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनिमित्त गणेश विसर्जन 28 सप्टेंबर, गुरुवार रोजी होणार आहे.

गणेश विसर्जनाचा शुभ योग

28 सप्टेंबर रोजी सूर्योदयानंतर गणेश विसर्जन सुरू होईल. या दिवशी भक्तगण गणपती बाप्पाला आनंदाने निरोप देतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची प्रार्थना करतात. यावेळी गणेश विसर्जनाच्या दिवशी रवी योगात असणार आहे. 28 सप्टेंबर रोजी रवि योग सकाळी 06.12 पासून सुरू होईल आणि रात्री 01.48 पर्यंत राहील. रवि योग हा अतिशय प्रभावी योग मानला जातो. असे मानले जाते की या योगात केलेले कार्य शुभ फल देते. या शुभ योगात गणेश विसर्जन केल्याने सर्व संकटे दूर होतील आणि जीवनात सुख-समृद्धी येईल.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. विष्णू भक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे. कारण अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. विष्णू भक्त अनंतची पूजा करतात आणि अनंत सूत्र म्हणजे त्यांच्या हातात अनंत धागा बांधतात. भगवान विष्णूची कथा या दिवशी वाचली जाते. या दिवशी उपवास करणारे कलशाची स्थापना करतात. यावेळी अनंत चतुर्दशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06:12 ते सायंकाळी 06:49 पर्यंत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com