Daily Horoscope 16 November Rashi Bhavishya : 'या' तीन राशींनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावं अन्यथा...; पाहा तुमचे भविष्य
मेष (Aries Horoscope Today) : उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत.
वृषभ (Taurus Horoscope Today) : धन लाभ होईल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. नवीन संयुक्तिक उपक्रम सुरू करण्याचा विचार असेल तर त्वरेने निर्णय घ्या. सध्या ग्रह आपणास अनुकूल आहेत. तुम्हाला जे हवे आहे ते करण्यास घाबरू नका. एकांतात वेळ घालवाल.
मिथुन (Gemini Horoscope Today) : कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. धन लाभ होण्याची शक्यता. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. उद्योग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल.
कर्क (Cancer Horoscope Today) : धन प्राप्ती होईल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता. जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. कामांच्या ठिकाणी एकाग्र होण्याची गरज.
सिंह (Leo Horoscope Today) : खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमचे प्रियजन आनंदी झाले असतील तर त्यांच्यासोबत संध्याकाळी मौजमजा करण्याचे बेत ठरवा. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. जोडीदार तुम्हाला सुस्वभावी बाजू दाखवेल.
कन्या (Virgo Horoscope Today) : आर्थिक तोटा होण्याची शक्यता. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. जोडीदाराला वेळ न दिल्याने नाराज होतील.
तूळ (Libra Horoscope Today) : आर्थिक स्थिती बिघडू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्म चिंतन करा. जोडीदारासोबवत वाद संभवतो परंतु, लगेच शमेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे.
धनु (Sagittarius Horoscope Today) : आर्थिक चणचण भासेल. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज. आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल.
मकर (Capricorn Horoscope Today) : खर्चाचे नियोजन करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius Horoscope Today) : आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces Horoscope Today) : प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. दूरच्या नातेवाईकांडून आलेली बातमी तुमचा दिवस उजळून टाकेल. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल.